जिल्ह्यात पावसाची शक्यता; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

 जिल्ह्यात पावसाची शक्यता; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

अकोला, दि. 2 : नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने जिल्ह्यात दि. 2 ते 5 ऑगस्टदरम्यान पावसाची शक्यता वर्तवली आहे.

जिल्ह्यातील दगडपारवा, पोपटखेड, उमा, वान आदी प्रकल्पाच्या धरणक्षेत्रात पाऊस झाल्यास कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नागरिकांनी नदी किंवा नाल्यामध्ये पोहण्याचा प्रयत्न करू नये. पूर पाहण्यासाठी नदीकाठावर जाऊ नये. वीज व पावसापासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. नदीकाठावर सेल्फी काढण्याचा मोह करू नये. पूरस्थितीत उंच ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ