आवश्यक कामांबाबत प्रस्ताव तत्काळ सादर करा जिल्हाधिका-यांचे विभागप्रमुखांना निर्देश

 आवश्यक कामांबाबत प्रस्ताव तत्काळ सादर करा

जिल्हाधिका-यांचे विभागप्रमुखांना निर्देश

अकोला, दि. 9 : जिल्ह्यात आवश्यक विकासकामे पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी प्रस्ताव तत्काळ द्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.

 

जिल्हा वार्षिक योजनेतील गतवर्षीच्या खर्चाचा व अखर्चित निधीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, नियोजनानुसार आवश्यक कामांच्या प्रशासकीय व तांत्रिक मान्यतांची कार्यवाही लवकर होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रस्ताव द्यावेत. आचारसंहिता लागण्यापूर्वी कामे पूर्णत्वास गेली पाहिजेत. सध्या चालू असलेली कामे विहित मुदतीत पूर्ण करून घ्यावीत. प्राथमिक आरोग्य केंद्रे, पशुवैद्यकीय दवाखाने, वर्गखोल्या आदी कामे प्राधान्याने पूर्ण करावीत.

पूर्ण झालेल्या कामांबाबत उपयोगिता प्रमाणपत्र सादर करावे. आय-पास प्रणालीचा वापर सर्व कार्यालयांनी करावा, अशी सूचना श्री. शास्त्री यांनी केली.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ