वि. ज. व भ. ज. विकास महामंडळातर्फे वैयक्तिक कर्ज योजना

 

वि. ज. व भ. ज. विकास महामंडळातर्फे

वैयक्तिक कर्ज योजना

अकोला, दि. 10 : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातर्फे विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्ग प्रवर्गातील आर्थिक दुर्बल व्यक्तींसाठी वैयक्तिक कर्ज योजना राबविण्यात येत असून, पात्र व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

        वैयक्तिक कर्ज बँक व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजना ऑनलाईन राबविल्या जातात. त्याची माहिती महामंडळाच्या vjnt.in  या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

        बीज भांडवल कर्ज योजना व थेट कर्ज योजना ऑफलाईन राबविल्या जात असून, त्याची अर्ज विक्री कार्यालयात होत आहे.कार्यालयाचा पत्ता : पहिला माळा, वैष्णवी कॉम्प्लेक्स, पॉवर हाऊससमोर, गौरक्षण रस्ता, अकोला. दूरध्वनी क्रमांक (0724) 2459937.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ