जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी आरोग्य तपासणी शिबिर

 

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी आरोग्य तपासणी शिबिर

अकोला, दि. 23 : जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या संकल्पनेतून अकोला जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या सहकार्याने अधिकारी व कर्मचा-यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर व सीपीआर कार्यशाळा उद्या, गुरूवारी (दि. 24 ऑगस्ट)  नियोजनभवनात दु. 2 ते 5 या वेळेत होणार आहे.

शिबिरात रक्तदाब, रक्तशर्करा आदींबाबत तपासणी व आरोग्यविषयक मार्गदर्शन केले जाईल. सीपीआर कार्यक्रमात प्रथमोपचाराची क्रिया, प्रात्यक्षिक, सराव व चर्चासत्र होईल. सर्व विभागप्रमुख, विविध कार्यालयांतील अधिकारी,कर्मचारी यांनी  दुपारी 2 वाजता नियोजनभवनात उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना