जिल्ह्यात दि. 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबरदरम्यान आयुष्मान भव मोहिम राबविणार - जिल्हाधिकारी अजित कुंभार


अकोला, दि. 31 : केंद्र शासनाची आयुष्मान भव मोहिम दि. 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबरदरम्यान जिल्ह्यात सर्व आरोग्य संस्थांत राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्याचे निर्दे्श जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.

आयुष्मान भव मोहिम व नियमित लसीकरणाबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. दीपक करंजीकर आदी उपस्थित होते.

श्री. कुंभार म्हणाले की, सर्वांसाठी आरोग्य या उद्दिष्टपूर्तीसाठी आयुष्मान भव ही मोहिम महत्वाचे पाऊल आहे. मोहिमेत आयुष्मान आपल्या दारी 3.0, आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी आदी कार्यक्रम राबवला जाणार आहे. त्यादृष्टीने अचूक कृती आराखडा व गावोगाव प्रभावी अंमलबजावणी करावी. मिशन इंद्रधनुष मोहिमेत दि. 11 ते 16 सप्टेंबर, तसेच दि. 9 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत लसीकरणाचे 100 टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी लसीकरण न झालेल्या बालकांचे लसीकरण पूर्ण करण्यात येईल.      

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ