बैलाला ‘लंपी’ची लागण; घुसरपासून १० किमी क्षेत्रात प्रतिबंध

बैलाला ‘लंपी’ची लागण; घुसरपासून १० किमी क्षेत्रात प्रतिबंध अकोला, दि. 29 : अकोला तालुक्यातील घुसर या गावातील एका बैलामध्ये लंपी त्वचारोगाची लागण झाल्याचे आढळले असून, संसर्ग केंद्रापासून १० किमी क्षेत्रात जनावरांच्या वाहतुकीस प्रतिबंध घालण्यात आला आहे. याबाबतचा आदेश जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी आज निर्गमित केला. प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियमानुसार घुसर येथील संसर्ग केंद्रापासून १० किमी बाधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण करून परिसरात जनावरांची खरेदी व विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा व प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. संसर्ग केंद्राच्या ५ किमी परिघातील जनावरांना गोट पॉक्स लसीकरण 100 टक्के पूर्ण यावे, असे आदेश जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी पशुसंवर्धन उपायुक्त, पशुसंवर्धन अधिकारी, तसेच पशूवैद्यकीय सर्वचिकित्सालयाला दिले आहेत. जनावरांचा बाजार, यात्रा, पशुप्रदर्शन आदींना प्रतिबंधासाठी पोलीस व महसूल प्रशासनाने कार्यवाही करावी. लसीकरणाबरोबरच दक्षतेच्या अनुषंगाने पशुपालक बांधवांमध्ये जनजागृती करावी, असेही आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. 0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ