जिल्हाधिकारी निवासस्थानी ध्वजारोहण


 जिल्हाधिकारी निवासस्थानी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण

अकोला, दि. 15 : भारतीय स्वातंत्र्याचा 76 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी निवासस्थानी ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले.

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी राष्ट्रगीत, ध्वजवंदन, ध्वजारोहण कार्यक्रम झाला. जिल्हाधिका-यांनी यावेळी विविध बालगृहातील अनाथ मुलांशी संवाद साधला. यावेळी मिठाईवाटपाचाही कार्यक्रम झाला. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मीना प्रधान, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी राजू लाडूलकर, सूर्योदय बालगृहाचे शिवराज पाटील, शासकीय बालगृहाचे अधिक्षक जयश्री हिवराळे, वैशाली भटकर, जिल्हाधिका-यांचे स्वीय सहायक मोहन साठे, गजानन गवई यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिका-यांनी सर्वांशी संवाद साधून शुभेच्छा दिल्या.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ