महसूल सप्ताहाचा वृक्षारोपणाने समारोप




अकोला, दि. 7 : महसूल विभागातर्फे आयोजित महसूल सप्ताहाचा जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्षारोपणाने समारोप करण्यात आला.

अप्पर जिल्हाधिकारी  अनिल माचेवाड, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपजिल्हाधिकारी महसूल अनिता भालेराव, उपजिल्हाधिकारी निवडणूक महेश परांडेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी बी यु काळे, सहाय्यक पुरवठा अधिकारी संतोष शिंदे, संजय गांधी तहसीलदार अविनाश शिंगटे,  नझुल तहसीलदार डी टी पांधरे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. श्रमदानाने उपक्रमाचा शुभारंभ झाला. त्यानंतर ‘युवा संवाद’, ‘महसूलदिन’, ‘सैनिकहो तुमच्यासाठी’, महसूल अधिकारी व कर्मचा-यांचा व गुणवंत पाल्यांचा गौरव आदी विविध कार्यक्रम घेण्यात आले. तालुकास्तरावरही उपक्रम राबविण्यात आला. विविध योजना व उपक्रम लोकांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न असून, यापुढेही अशा उपक्रमांत सातत्य राखले जाईल, असे श्री. माचेवाड यांनी सांगितले.

000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ