दिव्यांग बांधवांनी थेट कर्ज योजनांचा लाभ घ्यावा दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे आवाहन

 दिव्यांग बांधवांनी थेट कर्ज योजनांचा लाभ घ्यावा

दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे आवाहन

अकोला, दि. 31 : दिव्यांग बांधवांसाठी दि. 3 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय शिबिर होणार आहे. त्याअनुषंगाने दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या विविध थेट कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

महामंडळामार्फत 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या पात्र व्यक्तींसाठी कर्ज व अर्थसाह्य योजना राबविल्या जातात.

दिव्यांग स्वावलंबन कर्ज योजना : फरिदाबाद येथील राष्ट्रीय महामंडळामार्फत दिव्यांग स्वावलंबन कर्ज योजनेत विविध लघुउद्योगांसाठी 50 हजार ते 5 लाख अर्थसाह्य वार्षिक व्याजदर 5 ते 9 टक्के दराने उपलब्ध करून दिले जाते.

वैयक्तिक थेट कर्ज योजना : राज्य महामंडळामार्फत 50 हजार रू. पर्यंत कुटीर उद्योगांसाठी वार्षिक व्याजदर 2 टक्के दराने कर्ज दिले जाते.

महाशरद वेब पोर्टल : दिव्यांग व्यक्तींना महाशरद वेब पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी केल्यास विनामूल्य सहायक साधने, उपकरणे उपलब्ध करून दिली जातात.  

दिव्यांग स्वावलंबन कर्ज योजना व वैयक्तिक थेट कर्ज योजना ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येत असून, महामंडळाच्या कार्यालयात संपर्क साधावा. हे कार्यालय डी. के. साठे यांची इमारत, मोहन भाजी भांडार चौक, तापडियानगर येथे आहे.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ