पातूर तालुक्यातील 9 गावांतील रास्त भाव दुकानांसाठी अर्ज मागविले

अकोला, दि. 18 : पातूर तालुक्यातील नऊ गावांतील विविध कारणांमुळे रिक्त असलेल्या रास्त भाव दुकानांसाठी इच्छूकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

पातूर तालुक्यातील जांभरूण, पळसखेड, बाभळी, दादुळगाव, पार्डी, कोठारी खुर्द, निमखेड, गोळेगाव, हिंगणा (वाडे) या गावांमध्ये रास्त भाव दुकाने मंजूर करण्यात येणार आहेत. तसा जाहीरनामा या गावांत प्रसिद्ध करण्याचे आदेश तहसीलदारांनी तलाठ्यांना दिले आहेत.

अर्जाचा नमुना तहसील कार्यालयात उपलब्ध असून, 100 रू. चलन भरून तो मिळू शकेल. तहसील कार्यालयात दि. 1 सप्टेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करता येईल.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना