‘महाज्योती’तर्फे पीएचडी संशोधकांना 24 कोटी वितरीत

 

 

 


‘महाज्योती’तर्फे पीएचडी संशोधकांना 24 कोटी वितरीत

 

अकोला, दि. 10 : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (महाज्योती) इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अधिछात्रवृत्ती योजना राबविण्यात येते. त्यात 2021 व 2022 या दोन वर्षांत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सुमारे 24 कोटी रू. निधी वितरीत करण्यात आला.

वर्ष 2021 मध्ये 648 विद्यार्थ्यांना, तसेच वर्ष 2022 मधे निवड झालेल्या 1 हजार 236 विद्यार्थ्यांना एकूण 24 कोटी 17 लक्ष 87 हजार सातशे 49 रुपये इतकी अधिछात्रवृत्ती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना  छात्रवृत्तीसोबत घरभाडे व आकस्मिक निधीही देण्यात येतो.

 

लक्षित गटातील उमेदवारांना संशोधनासाठी सहाय्य व्हावे, त्यांना संशोधन क्षेत्रात संधी मिळावी, त्यांचा विकास व्हावा या हेतूने पीएच.डी. अधिछात्रवृत्ती योजना राबविण्यात येते. अधिछात्रवृत्तीने विद्यार्थ्यांना निश्चिंत होऊन संशोधन कार्य करता येते. संदर्भग्रंथ मिळविण्याबरोबरच आवश्यक प्रवास करता येतो. मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेता येतो. नॉनक्रिमिलेअर उत्पन्न गटातील इच्छुक विद्यार्थ्यांकडून विहीत नमुन्यातील अर्ज www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर केवळ ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येतात.

योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन संशोधन कार्यात करिअर घडविण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी  केले आहे.

 ०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ