मूर्तिजापूरमधील पठाणपुऱ्यातील एका गाईत 'लंपी' आढळला संसर्ग केंद्रापासून १० किमी क्षेत्रात जनावरांच्या वाहतुकीस प्रतिबंध

 


अकोला, दि. २६ : मुर्तिजापूरमधील पठाणपुरा परिसरातील एका गाईला लंपी त्वचारोगाची लागण झाल्याचे आढळले. तसा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्यानुसार संसर्ग केंद्रापासून १० किमी क्षेत्र बाधित घोषित करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी विजय पाटील यांनी आज निर्गमित केला.

प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियमानुसार मुर्तिजापूर येथील पठाणपुरा परिसरातील संसर्ग केंद्रापासून १० किमी बाधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण करून परिसरात जनावरांची खरेदी व विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा व प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे, ५ किमी परिघातील जनावरांना गोट पॉक्स लसीकरण तात्काळ करण्यात यावे, असे आदेश जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जि. प. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, तसेच जिल्हा पशूवैद्यकीय सर्वचिकित्सालयाला देण्यात आले आहेत.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ