जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी-कर्मचा-यांनी घेतली पंचप्रण शपथ

                   माझी माती, माझा देश अभियानाचा जिल्ह्यात उत्साहात शुभारंभ



 जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी-कर्मचा-यांनी घेतली पंचप्रण शपथ

अकोला, दि. 9 : भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सांगता सोहळ्यानिमित्त मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश’ अभियानाला आजपासून जिल्ह्यात उत्साहात शुभारंभ झाला. नियोजनभवनात जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या उपस्थितीत अधिकारी व कर्मचा-यांनी पंचप्रण शपथ घेतली.    

नियोजनभवनात आज सकाळी 10 वाजता शपथ कार्यक्रम झाला. मातीचे उजळलेले दीप हाती धरून अधिकारी व कर्मचा-यांनी शपथ घेतली. विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, महिला, दिव्यांग कर्मचारी आदी सर्व कार्यक्रमात सहभागी होते. जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी सर्वांना पंचप्रण शपथ दिली.

भारताला २०४७ पर्यंत विकसित बनविण्याचे स्वप्न साकार करण्याची, गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकण्याची, देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान सदैव बाळगण्याची, एकता व एकजूट यासाठी कर्तव्यदक्ष राहण्याची, नागरिकाचे कर्तव्य बजावण्याची व देशाचे रक्षण करणाऱ्यांचा कायम आदर राखण्याची शपथ यावेळी घेण्यात आली. जिल्ह्यातील ग्रामपंचायती, इतर स्थानिक स्वराज्य संस्था, विविध शासकीय कार्यालये आदी अनेक ठिकाणी विविध मान्यवरांच्या सहभागासह पंचप्रण शपथ घेण्यात आली.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ