प्रकल्प कार्यालयातर्फे जागतिक आदिवासी अस्मिता दिन साजरा

 प्रकल्प कार्यालयातर्फे जागतिक आदिवासी अस्मिता दिन साजरा

अकोला, दि. 11 : आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्फे जागतिक आदिवासी अस्मिता दिन येथील रौनक मंगल कार्यालयात बुधवारी साजरा करण्यात आला.

जिल्हाधिकारी अजित कुंभार, प्रकल्प अधिकारी मोहनकुमार व्यवहारे, उमेश पवार, अजाबराव उईके, रामसिंग डाबेराव, सूरज सोळंके, शेरूसिंग सोळंके, विठ्ठल सोळंके, शिवसिंग सोळंके आदी उपस्थित होते.

विभागाच्या कल्याणकारी योजना गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले. डॉ. राजेश धनजकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विविध मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले.

किन्ही राजा येथील आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींनी आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे नृत्य सादर केले. यावेळी रक्तदान शिबिरही घेण्यात आले.

                                                                            000 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ