पं. दीनदयाळ उपाध्‍याय रोजगार मेळाव्यात 84 उमेदवारांची प्राथमिक निवड

 




  पं. दीनदयाळ उपाध्‍याय रोजगार मेळाव्यात

84 उमेदवारांची प्राथमिक निवड

 

          अकोला, दि. 10 : जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेच्या सहकार्याने आयोजित पं. दीनदयाळ उपाध्‍याय रोजगार मेळाव्यात विविध पदांसाठी 84 उमेदवारांची प्राथमिक निवड झाली.  

         

मेळाव्‍यात एकूण 203  उमेदवारांनी सहभाग नोंदविला. शैक्षणिक कागदपत्रांच्‍या आधारे  84 उमेदवारांची प्राथमिक निवड झाली. अकोला येथील इनोट्रो मल्‍टीसर्व्हिसेस व अॅबेल इलेक्‍ट्रो सॉफ्‍ट टेक्‍नोलॉजी, अमरावती येथील स्‍वतंत्र मायक्रो फायनान्‍स, छत्रपती संभाजीनगर येथील नवा भारत फर्टिलायझर व धुत इलेक्‍ट्रिकल्‍स सर्व्हिसेस, पुणे येथील टॅलेनसेतू सर्व्हिस व पिपल ट्री वेन्‍चर यांनी मेळाव्यासाठी  एकूण  २३०  रिक्‍त पदे  अधिसूचित  केली होती.

निवासी उपजिल्‍हाधिकारी विजय पाटील यांनी  सदिच्‍छा भेट देऊन कंपन्यांचे प्रतिनिधी व उद्योजकांशी चर्चा केली. त्यांच्या हस्ते निवड झालेल्‍या उमेदवारांना निवड पत्र प्रदान करण्‍यात आले.  गुणवत्ता व शैक्षणिक विकास विभागाचे समन्वय अधिकारी गजानन महल्‍ले प्रामुख्याने उपस्थित होते.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ