बालशक्ती व बालकल्याण पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

अकोला, दि. 18 : केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे देण्यात येणा-या बालशक्ती व बालकल्याण पुरस्कारासाठी दि. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.

वय 18 वर्षांहून कमी असलेल्या व शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, सामाजिक कार्य, शैर्य अशा क्षेत्रात नैपुण्यपूर्ण कामगिरी करणा-या मुलांना बालशक्ती पुरस्कार दिला जातो. बालकल्याण पुरस्कार वैयक्तिक व संस्था अशा दोन स्तरावर दिला जातो. मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण क्षेत्रात विनामानधन उदात्त भावनेने किमान 7 वर्षे कार्य करणा-या व्यक्तीला वैयक्तिक पुरस्कार मिळतो. बालकल्याण क्षेत्रात अपवादात्मक व किमान 10 वर्षांपासून कार्य करणा-या संस्थेला पुरस्कार दिला जातो. ही संस्था पूर्णत: शासकीय आर्थिक मदतीवर अवलंबून नसावी.

 याबाबतचे अर्ज, माहिती www.awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन मिळू शकेल. याच संकेतस्थळावर अर्ज दाखल करता येतील.

००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम