मागासवर्ग आयोगाकडून अकोल्यात विविध बाबींचा आढावा



 मागासवर्ग आयोगाकडून अकोल्यात विविध बाबींचा आढावा 

अकोला, दि. 8 : राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी अकोला येथे आज  जनसुनावणी, क्षेत्रपाहणीसह समाजकल्याण, शिक्षण व जात पडताळणी आदी विविध बाबींचा बैठकांद्वारे आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.

        आयोगाकडून सदस्य सेवानिवृत्त न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम,  प्रा. डॉ. गजानन खराटे, प्रा. डॉ. निलिमा सरप (लखाडे) यांच्यासह स्वीय सहायक अरविंद माने व श्रीमती मते उपस्थित होते.

        प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संवर्गाच्या  इतर  मागासवर्ग  बिंदुनामावली व जिल्हा बदल्यांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे, जिल्हा  जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कामकाजाचाही आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी महाविद्यालयांना देऊन वेळीच अर्जाची पूर्तता व्हावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले.  

 

                 आयोगातर्फे तेलंगी समाज जनसुनावणी झाली. आयोगाच्या सदस्यांनी जनसुनावणीत सहभागी सर्व उपस्थितांचे म्हणणे ऐकून घेतले व निवेदनेही स्वीकारली. सर्व उपविभागीय अधिका-यांसह समाजकल्याण उपायुक्त अमोल यावलीकर, सहायक समाजकल्याण आयुक्त मंगला मून, शिक्षणाधिकारी सुचेता पाटेकर यांच्यासह विविध विभागांचे अनेक अधिकारी उपस्थित होते.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ