वसंतराव नाईक वि. ज. व भ. ज. विकास महामंडळातर्फे वैयक्तिक कर्ज योजना

 वसंतराव नाईक वि. ज. व भ. ज. विकास महामंडळातर्फे

वैयक्तिक कर्ज योजना

अकोला, दि. 4 : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातर्फे विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्ग प्रवर्गातील आर्थिक दुर्बल व्यक्तींसाठी वैयक्तिक कर्ज योजना राबविण्यात येत असून, पात्र व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

        वैयक्तिक कर्ज बँक व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजना ऑनलाईन राबविल्या जातात. त्याची माहिती महामंडळाच्या vjnt.in  या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

        बीज भांडवल कर्ज योजना व थेट कर्ज योजना ऑफलाईन राबविल्या जात असून, त्याची अर्ज विक्री कार्यालयात आहे. हा अर्ज 10 रूपयांना मिळतो. थेट कर्ज योजनेचा अर्ज घेताना आधारकार्ड, जातीचा दाखला व शिधापत्रिका सोबत ठेवावी. अर्ज केवळ अर्जदाराला मिळेल. मध्यस्थामार्फत अर्ज विक्री व स्वीकृती होणार नाही. विक्री व्यवसायासंबंधी प्रशिक्षण घेतलेले, तसेच विधवा व निराधार महिलांना प्राधान्य देण्यात येते, असे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एच. जी. आत्राम यांनी सांगितले.

        महामंडळाचे कार्यालय गौरक्षण रस्त्यावर पॉवरहाऊससमोर वैष्णवी कॉम्प्लेक्समध्ये आहे. दूरध्वनी क्रमांक (0724) 2459937 असा आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ