व्यवसाय शिक्षण सहसंचालक प्रदीप घुले यांची ‘आयटीआय’ला भेट.




 

 व्यवसाय शिक्षण सहसंचालक प्रदीप घुले यांची ‘आयटीआय’ला भेट.

 

'कौशल्य वार्ता'चे प्रकाशन आणि  व्हर्च्युअल क्लासरूमचा प्रारंभ

अकोला, दि. 20 : विभागीय व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण सहसंचालक प्रदीप घुले यांनी नुकतीच येथील मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भेट देऊन उपक्रमांची पाहणी केली.

 

राज्यातील 75 ‘आयटीआय’मध्ये व्हर्च्युअल क्लासरूमचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे झाला. यावेळी अकोला येथील कार्यक्रमात श्री. घुले, जिल्हा व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण अधिकारी गजानन चोपडे, कौशल्य तथा नाविन्यता सहआयुक्त दत्तात्रय ठाकरे , संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य  विलास अनासने तसेच प्राचार्य शरदचंद्र ठोकरे , गटनिदेशक रेखा रोडगे, मुख्य लिपिक जयंत गणोजे आदी उपस्थित होते.  

संस्थेतील इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थींनी  जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकावला. श्री. घुले यांनी त्यांच्याशी संवाद साधून कौतुक केले. इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायाचे  शिल्पनिदेशक अरविंद  पोहरकर  यांच्या संकल्पनेतून आणि प्राचार्य शरदचंद्र ठोकरे यांच्या मार्गदर्शनात 'कौशल्य वार्ता' या अनियतकालिकाचे प्रकाशन विभागीय सहसंचालकांच्या हस्ते झाले.  श्री. घुले यांनी संस्थेच्या सर्व विभागांना भेट देऊन आढावा घेतला व सर्व सहका-यांशी संवाद साधला. 

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ