सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील वस्तूंचे वाटप परिमाण जाहीर

 

 सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील वस्तूंचे वाटप परिमाण जाहीर

अकोला, दि. 1 : सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अन्नधान्य , नियंत्रित साखर आदी जीवनावश्यक वस्तूंचे अकोला जिल्ह्यासाठी सप्टेंबर महिन्याचे वाटप परिमाण जिल्हा पुरवठा अधिका-यांनी जाहीर केले आहे.

त्यानुसार प्राधान्य गटातील लाभार्थ्यांसाठी गहू प्रतिव्यक्ती 2 किलो व फोर्टिफाईड तांदूळ प्रतिव्यक्ती 3 किलो विनामूल्य वितरित होईल. अंत्योदय अन्न योजनेत गहू प्रतिकार्ड 10 किलो व फोर्टिफाईड तांदूळ प्रतिकार्ड 25 किलो विनामूल्य वितरित होईल. अंत्योदय लाभार्थ्यांसाठी 20 रू. प्रतिकिलो दराने नियंत्रित साखर प्रतिकार्ड 1 किलो वितरित होईल. गोदामातील साठा उपलब्धता व लाभार्थी संख्येनुसार वाटपाचे परिमाण राहील.

शासनाकडून कल्याणकारी संस्था व वसतिगृह योजनेच्या वाटप परिमाणात सुधारणा करण्यात आली असून, त्यासाठी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत प्रति लाभार्थी प्रतिमहिना गहू 7 किलो व तांदूळ 8 किलो असे परिमाण आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ