विनापरवाना कॅफेवर कायदेशीर कारवाई करणार

विनापरवाना कॅफेवर कायदेशीर कारवाई करणार विधी सेवा प्राधिकरणाचा निर्णय अकोला, दि. 3 : शहरात शिकवणी वर्ग व खासगी क्लासेसच्या परिसरात चालणा-या विनापरवाना कॅफेवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे झालेल्या बैठकीत नुकताच घेण्यात आला. बालकांसाठी कार्य करणा-या विविध शासकीय संस्थांची बैठक प्राधिकरणाच्या कार्यालयात झाली. प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर यांच्यासह जिल्हा महिला व बालविकास कार्यालय व महापालिकेच्या परवाना विभागाचे अधिकारी उपस्थित होते. खासगी शिकवणी वर्गाच्या परिसरात कॅफे अनधिकृतपणे चालवले जातात. अशा कॅफेमधून शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बाबतीत काही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी अवैध कॅफेवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. ०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ