कॅरम स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव




अकोला, दि. 14 : जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे विदर्भ कॅरम अकॅडमी येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.

जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट, बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीचे सचिव पवन माहेश्वरी, रेडक्रॉस सोसायटीचे ॲड. सुभाषसिंह ठाकूर, अविनाश देशमुख, अखिल भारतीय कॅरम फेडरेशनचे प्रभजीत सिंह बछेर आदी उपस्थित होते.

 वयोगट 14, 17 व 19 वर्षांच्या आतील मुले व मुली अशा एकूण 56 शाळांच्या सुमारे 900 खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेचे पंचप्रमुख मेहबूब शेख, तांत्रिक अधिकारी तौकिर खान, किरण पारडे, अभय गोटीकर, तसेच  स्पर्धाप्रमुख म्हणून तन्वीर खान यांनी काम पाहिले. मंगेश धुरंधर, सूरज गायकवाड, सलोनी जामनिक, नयना खंडारे, शेख रेहान, शेख अर्सलान, वैभव धुरंधर, विवेक नवघरे, राघव तापडिया यांनी पंच म्हणून काम पाहिले. क्रीडा अधिकारी मनीषा ठाकरे, निशांत वानखडे, राजू उगवेकर, अजिंक्य धेवडे, गजानन चाटसे यांनी परिश्रम घेतले.

००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ