सहकार विभागाच्या परीक्षेसाठी अकोल्यात दोन केंद्रे

 

सहकार विभागाच्या परीक्षेसाठी अकोल्यात दोन केंद्रे

अकोला, दि. 10 : सहकार विभागातील गट क संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्यासाठी दि. 14 ऑगस्ट व दि. 16 ऑगस्ट रोजी ऑनलाईन परीक्षा होणार असून, प्रवेशपत्राबाबतच्या सूचना परीक्षार्थ्यांच्या मोबाईल क्रमांक व ई-मेलवर पाठविण्यात आल्या आहेत. या परीक्षेसाठी अकोला जिल्ह्यात दोन परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

या परीक्षेसाठी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बाभूळगाव, नागपूर रस्ता, अकोला आणि श्री इन्फोटेक, दत्तात्रय पेट्रोलपंपाजवळ, वाशिम रस्ता, कापशी, अकोला ही दोन केंद्रे असतील. उमेदवारांना प्रवेशपत्र डाऊनलोड करावयाची लिंक व इतर सूचना

सहकार आयुक्त व निबंधकांच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येतील.

या संकेतस्थळावरून उमेदवारांनी परीक्षेचे प्रवेशपत्र प्राप्त करावे आणि परीक्षेस येताना त्याची रंगीत प्रत सोबत ठेवावी. तसेच प्रवेशपत्रात नमूद सूचनांचे पालन करावे, असे आवाहन उपनिबंधक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा