‘स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज 2023’मध्ये सर्व महाविद्यालयांनी सहभागी व्हावे जिल्हाधिका-यांचे आवाहन

 

‘स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज  2023’मध्ये सर्व महाविद्यालयांनी सहभागी व्हावे

जिल्हाधिका-यांचे आवाहन

 

                      अकोला, दि. 3 : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या  नाविन्यपुर्ण संकल्पनांना योग्य व्यासपीठ  उपलब्ध व्हावे यासाठी राज्य  नाविन्यता सोसायटीमार्फत  स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज  2023’  राबविण्यात येत असुन महाविद्यालयांनी नोंदणी करून अधिकाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग मिळवून द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले.

उपक्रमाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची ऑनलाईन बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.

               राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे स्टार्टअप परिसंस्था बळकटीकरण,इनक्युबेटर्सची स्थापना व विस्तार, गुणवत्ता  परीक्षण  व बौद्धिक संपदा  हक्कासाठी अर्थसहाय्य आदी उपक्रम राबविले जातात. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या  नाविन्यपुर्ण संकल्पनांना व्यासपीठ मिळण्यासाठी ‘स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज  2023’  राबविण्यात येत आहे. प्रत्येक महाविद्यालयाने आपल्या स्तरावरून प्रचार प्रसिद्धी करावी, संकेतस्थळावर महाविद्यालयाची नोंदणी करावी,   स्पर्धेचे माहितीफलक दर्शनी भागात लावावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.

                        कौशल्य विकास विभागाच्या www.mahaswayam.gov.in  या  संकेतस्थळावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याबाबत तसेच  कौशल्य मागणी सर्वेक्षणात सर्व विद्यार्थ्यांना  सहभागी करून घेण्याबाबत महाविद्यालयांना सुचित करण्यात आले.

                        जिल्हा कौशल्य  विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज 2023 या स्पर्धेचे समन्वयन करण्यात येत असून याबाबत अधिक माहितीसाठी या कार्यालयास प्रत्यक्ष अथवा 0724-2433849  या दुरध्वनी क्रमांकावर अथवा  9665775778  या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केंद्राचे सहायक आयुक्त द. ल. ठाकरे यांनी केले.          

००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ