वृत्तपत्रविद्या आणि कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी 'अभिव्यक्ती मताची' स्पर्धेत भरघोस बक्षीसे

 

वृत्तपत्रविद्या आणि कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी 

                        'अभिव्यक्ती मताची' स्पर्धेत भरघोस बक्षीसे 

 

अकोला, दि. 23 : विद्यार्थ्यांमधील नवनवीन संकल्पना आणि सर्जनशीलतेचा उपयोग मतदार जागृतीसाठी व्हावा या उद्देशाने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘अभिव्यक्ती मताची’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.

स्पर्धेचा कालावधी १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२३ हा असून या स्पर्धामध्ये महाराष्ट्रातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या (मास मीडिया व जर्नालिजम) महाविद्यालये आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.

             या स्पर्धेत जाहिरातनिर्मिती, भित्तीपत्रक (पोस्टर) आणि घोषवाक्य या तीन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. तीनही स्पर्धाचे विषय आणि नियमावली मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर स्पर्धाचे विषय असे आहेत : (१) युवा वर्ग आणि मताधिकारी, (२) मताधिकार लोकशाहीचा स्तंभ, (३) एका मताचे सामर्थ्य, (४) सक्षम लोकशाहीतील मतदाराची भूमिका / जबाबदारी, (५) लोकशाहीतील सर्वसमावेशकता आणि मताधिकार, तीनही स्पर्धांचे माध्यम मराठी, हिंदी आणि इंग्रजी आहे.  

जाहिरात निर्मिती स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक रु. १ लक्ष,  दुसरे पारितोषिक रु. ७५ हजार, तिसरे पारितोषिक रु. ५० हजार रु. आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी १० हजार रुपयांची आहेत. भित्तिपत्रक (पोस्टर) स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक ५० हजार रु., दुसरे पारितोषिक २५ हजार रु. आणि तिसरे पारितोषिक १० हजार रु. आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी ५ हजार रुपयांची आहेत. घोषवाक्य स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक २५ हजार रु., दुसरे पारितोषिक १५ हजार रु व तिसरे पारितोषिक १० हजार रु. आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी ५,००० रुपयांची आहेत.

            महाराष्ट्रातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालयांच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

००००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ