मेरी माटी, मेरा देश अभियानात ठिकठिकाणी बुधवारी पंचप्रण शपथ कार्यक्रम

मेरी माटी, मेरा देश अभियानात ठिकठिकाणी

   पंचप्रण शपथ कार्यक्रम

 

 

अकोला, दि. 8 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त देशभर ‘मेरी माटी, मेरा देशहे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात उद्या दि.9 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता पंचप्रण शपथ घेतली जाणार आहे. नागरिकांनी या शपथ कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.

 

जिल्हा, तालुकास्तरीय सर्व कार्यालये तसेच ग्रामपंचायतींमध्ये शपथ कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावरील सर्व अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, नागरिकांनी एकत्र येऊन पंचप्रण (शपथ) घ्यावयाची आहे. शपथ घेताना हातात माती किंवा मातीचे दिवे प्रज्वलित करून पंचप्रण शपथ घेण्यात यावी. नागरिकांनी आपल्या सोयीप्रमाणे नजिकचे शासकीय कार्यालय, ग्रामपंचायत येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

गाव ते शहरांपर्यंत आपल्या भूमीविषयी प्रेम, जागृती आणि साक्षरता निर्माण व्हावी, हा या अभियानाचा उद्देश आहे.  पंचप्रण शपथ घेताना पुढीलप्रमाणे घेण्यात यावी. ‘‘आम्ही शपथ घेतो की, भारतास 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करु. गुलामीची मानसिकता मूळापासून नष्ट करु. देशाच्या समृध्द वारशाचा गौरव करु. भारताची एकात्मता बलशाली करु आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू. देशाचे नागरीक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करु’’.

 

 

अभियानात सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी https://merimaatimeradesh.gov.in/ हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर शपथ घेतांना मातीचा दिवा किंवा माती हाती धरून काढलेले सेल्फी अपलोड करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

0000000

 


 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ