मेरी माटी, मेरा देश सर्व कार्यालयात 'पंचप्राण शपथ' कार्यक्रम होणार

अकोला, दि. ७ : 'मेरी माटी, मेरा देश' उपक्रमाचा प्रारंभ दि. ९ ऑगस्टला होत असून, यादिवशी सकाळी १० वाजता जिल्ह्यातील सर्व कार्यालयांत 'पंचप्राण शपथ' कार्यक्रम होणार आहे.


सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपक्रमात सहभागी व्हावे, तसेच ठिकठिकाणी नागरिकांनीही 'पंचप्राण शपथ' घेऊन उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.

भारताला २०४७ पर्यंत विकसित बनविण्याचे स्वप्न साकार करण्याची, गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकण्याची, देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान सदैव बाळगण्याची, एकता व एकजूट यासाठी कर्तव्यदक्ष राहण्याची, नागरिकाचे कर्तव्य बजावण्याची व देशाचे रक्षण करणाऱ्यांचा कायम आदर राखण्याची शपथ यादिवशी देशबांधव घेणार आहेत.

--

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ