जिल्हा काम वाटप समितीची बैठक 21 ऑगस्टला होणार

 

जिल्हा काम वाटप समितीची बैठक 21 ऑगस्टला होणार

अकोला, दि. 9 : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या दालनात दि. 21 ऑगस्ट रोजी दु. 4.30 वा. होणार आहे.

या बैठकीत प्राप्त प्रस्तावित कामांचे वाटप करण्यात येणार असून, नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार तीन लाख रू. मर्यादेस अधिन राहून कामाच्या वाटपासाठी प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), अकोला, तसेच प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तेल्हारा यांच्याकडून प्रत्येक 1 पूर्णवेळ कंत्राटी सफाईगार कामगार पुरविणे ही कामे वाटप करण्यात येतील. इच्छूक संस्थांनी आपला प्रस्ताव दि. 18 ऑगस्टपूर्वी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात संमतीपत्र व सर्व सभासदांच्या सेवायोजन कार्डाच्या प्रतीसह सादर करावा, तसेच दि. 21 ऑगस्टला नियोजित बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ