पोस्टाच्या निवृत्तीधारकांसाठी सप्टेंबरमध्ये पेंशन अदालत

 

 पोस्टाच्या निवृत्तीधारकांसाठी सप्टेंबरमध्ये पेंशन अदालत

अकोला, दि. 23 :  टपाल विभागाच्या महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्तर जनरल यांच्यातर्फे विभागाच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी व कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांसाठी 53 वी पेंशन अदालत दि. 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता मुंबई येथील त्यांच्या कार्यालयात होईल. 

निवृत्तीवेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, निवृत्ती किंवा मृत्यूनंतर तीन महिन्याच्या आत पूर्तता न झालेल्या प्रकरणांचा अदालतीत विचार केला जाईल. कायदेशीर प्रकरणे, वारसा प्रमाणपत्र, कल्पित पेंशन, टीबीओपी, एमसीपी पदोन्नती, वेतनश्रेणी वाढ,  धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्या आणि डीपीसीच्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणांचा विचार होणार नाही. संबंधितांनी आपला अर्ज तीन प्रतीत लेखा अधिकारी, अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल, कार्यालय, जीपीओभवन, दुसरा मजला, मुंबई-400001 येथे दि. 25 ऑगस्टपूर्वी पाठवावा, असे आवाहन प्रवर डाक अधिक्षकांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ