वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अवयवदानाबाबत जनजागृती

  वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अवयवदानाबाबत जनजागृती                     

अकोला, दि. 8 : शासकीय  वैद्यकीय  महाविद्यालयातर्फे अवयवदान जनजागृती  मोहिमेत रॅली, प्रश्नमंजुषा, रांगोळी, भित्तीपत्रक स्पर्धा आदी कार्यक्रम नुकतेच झाले.

          अवयवदान जनजागृती रॅली इंडियन रेड  क्रॉस सोसायटीचे अध्यक्ष  प्रभजीतसिंह  बच्छेर यांच्या प्रमुख उपस्थितीत व विद्यार्थ्यांच्या मोठ्या सहभागात काढण्यात आली. रांगोळी स्पर्धेत परिचर्या विभागाच्या 40 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.  पदवीपूर्व  विद्यार्थ्यांनी ‘अवयवदान जनजागृती’ या संकल्पनेवर भित्तीपत्रक स्पर्धा  व प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेमधील गुणवंतांना मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

                      समारोपप्रसंगी अधिष्ठाता डॉ.  मिनाक्षी गजभिये व वैद्यकीय अधिक्षक डॉ. अभय बागूल यांनी आपल्या भाषणातून अवयवदानाचे महत्व पटवून दिले. जनऔषध वैद्यकशास्त्र  विभागाचे डॉ.  मनोज  तालापल्लीवार    यांनी प्रास्ताविक केले. डॉ. ममता राठोड यांनी सूत्रसंचालन केले. जनऔषध वैद्यकशास्त्र   विभागाचे  अध्यापक डॉ. संजीव चौधरी , डॉ.  निलम सुखसोहळे, डॉ. संजय वाघ, डॉ. पुष्पा लोकरे यांनी परिश्रम घेतले. 

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ