निवडणूक आयोगाकडून ग्रा. पं.साठी सुधारित मतदार यादी कार्यक्रम

 निवडणूक आयोगाकडून ग्रा. पं.साठी सुधारित मतदार यादी कार्यक्रम

अकोला, दि. 4 : राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदार यादीच्या पूर्वीच्या कार्यक्रमात बदल करून सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार विहित मुदतीत मतदार याद्या तयार करण्यात याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी तहसीलदारांना दिले आहेत.

 

 

जानेवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणा-या, नवनिर्मित व 2022 मध्ये चुकीची प्रभागरचना झाल्याने निवडणूक होऊ न शकलेल्या सुमारे 2 हजार 284 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, तसेच निधन, राजीनामा, अनर्हता आदी कारणांनी रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने मतदार यादीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

सुधारित कार्यक्रमानुसार, मतदार यादी ग्राह्य धरण्याची तारीख शनिवार, दि. 1 जुलै 2023 ही आहे. प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी दि. 10 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी दि. 10 ते 21 ऑगस्ट आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी दि. 25 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होईल.  या कार्यक्रमानुसार पारंपरिक पद्धतीने मतदार याद्या तयार करण्यात याव्यात, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ