‘आयटीआय’मध्ये 9 ऑगस्टला रोजगार मेळावा

 

‘आयटीआय’मध्ये 9 ऑगस्टला रोजगार मेळावा

अकोला, दि. 1 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व ‘सुझुकी मोटर्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळावा रतनलाल प्लॉट येथील ‘आयटीआय’मध्ये दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वा. होणार आहे.

फीटर, टर्नर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, डिझेल मेकॅनिक, पेंटर जनरल, मशिनिस्ट, मोटर मेकॅनिक, टुल अँड डायमेकर, ट्रॅक्टर मेकॅनिक, पीपीओ,  सीओई ऑटोमोबाईल आदी पदे मेळाव्याद्वारे भरण्यात येतील. दहावीत किमान 40 टक्के व आयटीआयमध्ये 50 टक्के गुण असलेल्या, तसेच वय 18 ते 24 दरम्यान असलेल्या पुरूष उमेदवारांना मेळाव्यात सहभाग मिळू शकेल. इच्छूकांनी सहभाग घेण्याचे आवाहन मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्रातर्फे करण्यात आले.

०००

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन