‘सारथी’तर्फे देणार लक्षित गटातील 500 उमेदवारांना प्रशिक्षण

 

‘सारथी’तर्फे देणार लक्षित गटातील 500 उमेदवारांना प्रशिक्षण

अकोला, दि. 3 : छत्रपती शाहू महाराज  संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतर्फे (सारथी) अकोला जिल्ह्यात मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी मराठा या लक्षित गटातील 500 उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी अधिकाधिक उमेदवारांनी अर्ज करावा, असे आवाहन कौशल्य विकास सहायक आयुक्त द. ल. ठाकरे यांनी केले आहे.

 

सारथीच्या मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी मराठा या लक्षित गटातील उमेदवारांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षणातून रोजगार व स्वंयरोजगार मिळावा यासाठी राज्य कौशल्य विकास सोसायटी व सारथी यांच्यात  सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. त्यानुसार यावर्षी जिल्ह्यातील एकूण 500  उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येईल. सारथी कार्यालयामार्फत  जिल्ह्यामधून ‘स्कील इंडिया’ पोर्टलवरील विविध सेक्टरमधील अभ्यासक्रमांसाठी 5 स्टार, 4 स्टार,  व 3 स्टार ट्रेनिंग सेंटर यांना  विहित प्रक्रियेचा अवलंब करून उदिष्ट वितरित करण्यात येणार आहे.

                   सोसायटीच्या संकेतस्थळावर उमेदवारांसाठी नोंदणी फॉर्म उपलब्ध असुन त्याची लिंक  Ans://kaushalya.mahaswayam.gov.in./users/sarthi अशी आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी  सहभाग नोंदवावा तसेच याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राला प्रत्यक्ष अथवा 0724-2433849  या दुरध्वनी क्रमांकावर अथवा  9665775778  वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 ०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ