कृषी विभागातर्फे सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेबाबत अकोटमध्ये शुक्रवारी कार्यशाळा

अकोला, दि. 17 : केंद्रीय कृषी सहकार व शेतकरी कल्याण विभाग, तसेच कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने कृषी पायाभूत सुविधा निधी  योजना व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचे उन्नयन योजना याबाबत कार्यशाळा अकोट पंचायत समिती येथे उद्या, शुक्रवार, दि. 18 ऑगस्ट  रोजी सकाळी 10 वा. होणार आहे.

शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक गट, महिला बचत गट, सहकारी संस्था, वैयक्तिक शेतकरी तसेच भूमिहीन व्यक्ती यांना खाद्य प्रक्रिया उद्योग उभारण्याकरिता 35 टक्के अनुदान देय आहे, तसेच एआयएफअंतर्गत बाजार संपर्क वाढवून निव्वळ उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी माल काढणी पश्चात सुविधा निर्माण करण्याच्या हेतूने रु. 2 कोटी मर्यादेपर्यंतच्या सर्व बँक कर्जावर वार्षिक तीन टक्के व्याज सवलत असुन, ही सवलत जास्तीत जास्त 7 वर्षासाठी उपलब्ध असेल.

कृषी खाद्य उद्योग उभारण्यास इच्छुक व सदर योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टीने तालुक्यातील जास्तीत जास्त होतकरू शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सदस्य, शेतकरी उत्पादक गटांचे सदस्य, महिला बचत गटांचे सदस्य, सहकारी संस्थेचे सदस्य, भूमिहीन व्यक्ती आदींनी सदर कार्यशाळेस नियोजित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन  तालुका कृषी अधिकारी सुशांत शिंदे यांनी केले आहे.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ