जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

 












अकोला, दि. 15 : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात दिमाखात फडकणारा राष्ट्रध्वज, देशासाठी योगदान देणा-या स्वातंत्र्यसैनिक, सैनिकांच्या कुटुंबियांची उपस्थिती, राष्ट्रगीताचे आसमंतात निनादणारे सूर अशा उत्साहपूर्ण व मंगलमय  वातावरणात भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापनदिन आज साजरा करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य सोहळ्यात जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संगीता अढाऊ, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपजिल्हाधिकारी महेश परांडेकर, अनिता भालेराव, उपवनसंरक्षक कुमारस्वामी यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर, स्वातंत्र्यसैनिक व शहिद सैनिकांचे कुटुंबिय, अधिकारी, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमात सुरुवातीला जिल्हाधिका-यांच्या हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले. पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर राष्ट्रगीताची धून वाजवून राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत सादर करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिका-यांनी स्वातंत्र्यसैनिक, शहिद सैनिक यांच्या कुटुंबियांना व विविध मान्यवर, अधिका-यांना भेटून संवाद साधला व सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.  

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या सांगतेनिमित्त ‘मेरी माटी, मेरा देश’ ही मोहिम सर्वदूर राबविण्यात येत असून, ‘पंचप्रण शपथ’,  स्वातंत्र्यसैनिक आणि शूरवीरांचा सन्मान म्हणून गावोगाव शिलाफलक, अमृतवाटिका आदी उपक्रम राबविण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गावोगाव स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध शासकीय कार्यालये, पंचायत समित्या, नगरपरिषदांच्या इमारतींवर रोषणाई करण्यात आली.  

 स्वातंत्र्यदिन सोहळ्यात दिवंगत स्वातंत्र्यसैनिकांच्या पत्नी, वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी, तसेच विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांची नावे याप्रमाणे-

दिवंगत स्वातंत्र्यसैनिकांच्या पत्नी : शांताबाई मोतीराम हातेकर, द्वारकाबाई गोविंदराव तारापुरे, चंद्रप्रभा आकाराम थोरात, कलावती श्रावण तायडे, विजया यशवंत मेंडकी, निर्मला कृष्णकांत तारकस, शशिकला उत्तम गिरी, सुमनबाई नारायण क्षीरसागर, कमलबाई लक्ष्मणराव धोत्रे, देवकाबाई पंढरी मोपारी, रूक्माबाई श्रीराम शर्मा, शकुंतलाबाई केशवराव चतारे, ताराबाई लक्ष्मणराव गावंडे, शेवंताबाई शंकरराव राऊत, जनाबाई शंकरराव बदरखे, गंगुबाई नारायण अढाऊ, अनुसयाबाई तुकाराम नावकार, मनकर्णाबाई भगवान इंगळे, मंगलाबाई विश्राम सरप, कलावती मोतीराम थोरात, कौसल्याबाई शंकरगिरी गोसावी.

        निर्मला नारायण हिवराळे, रमाबाई शंकरराव देशमुख, मनकर्णाबाई श्रीराम सस्तीकर, आशाबाई देवराव नवले, कमलादेवी नारायणप्रसाद मिश्रा, कलावतीबाई अवधुतराव गावंडे, पुष्पाबाई पुरूषोत्तमराव देशमुख, विमल नरहरराव पाटील, सुमनताई नारायणराव भोसले, अंजनाबाई फकिरा अवचार, गंगुबाई हरिभाऊ हिरळकार, प्रमिला वसंतराव देशमुख, गोकर्णाबाई महादेवराव जाधव, सुशीलाबाई गणपत आकेवार, शांताबाई कमलाकर जैन, लिलाबाई तिरथसिंग रोहेल, उर्मिला महादेवराव मुळतकर, पंचफुलाबाई सदाशिव मानकर, विजया मधुसूदन वैराळे, ताराबाई मारेश्वर देशपांडे, राधाबाई विठ्ठलचंद खत्री, विमलबाई पुंडलिकराव पाटील, कौसल्याबाई सुखदेव लोखंडे, कोकिळाबाई केशवराव गावंडे, कौसल्याबाई पुंडलिक भगत, पंचफुलाबाई बळीराम आखरे.

                                 वीरमाता/वीरपत्नी/वीरपिता

यावेळी वीरपत्नी शांताबाई शालिग्राम दांगटे, यमुनाबाई उदेभान तेलगोटे, ताराबाई महादेव तायडे, लक्ष्मीबाई दुर्योधन सिरसाट, नर्मदाबाई प्रल्हाद साव, विमलबाई आनंदा काळपांडे, आशाबाई अनिल निखाडे, मंगलाबाई सुधाकर खर्डेकर, नूतन नंदकिशोर खर्डेकर, प्रभावती हरिश्चंद्र वानखडे, सुरेखा भास्कर पातोंड, इंदूमती तेजराव दंदी, मीना विनोद मोहोड, शीतल संजय खंडारे, तसेच वीरमाता कलावती शेषराव म्हैसने, सरूबाई यशवंत देशमुख, लीलाबाई विनोद देशमुख, निर्मलादेवी संतोष जामनिक, मनकर्णाबाई विजय तायडे, मंदाताई कैलास निमकंडे, ताईबाई प्रशांत राऊत, गोकर्णा आनंद गवई, मायावती सुमेध गवई आणि  वीरपिता श्रीराम ताथोड यांना गौरविण्यात आले.

त्याचप्रमाणे, पोलीस उपअधिक्षक सुभाष दुधगावकर यांना गुणवत्तापूर्णा सेवेसाठी राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल, तसेच आपत्ती व्यवस्थापनात उत्कृष्ट कामगिरीबद्दल जीवरक्षक दीपक सदाफळे यांना यावेळी गौरविण्यात आले.

शिक्षण विभागातर्फे शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीतील गुणवंत अनुज गारवे, दिविज बन्सल, अंश अग्रवाल, रिद्धी राठी, समृद्धी काळंके, अथर्व ठाकूर, अंशुल पटोकार, शौर्या शेगोकार या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

जिल्हा परिषदेतर्फे आर. आर. आबा पाटील जिल्हा सुंदर गाव पुरस्कार अकोट तालुक्यातील लोहारी खु. या गावाचे सरपंच व सचिवांना प्रदान करण्यात आला. तालुका सुंदर गाव पुरस्कार कोठारी (ता. अकोला), लोहारी खु. (ता. अकोट), उरळ बु. (ता. बाळापूर), खेर्डा (ता. बार्शीटाकळी), सोनोरी (ता. मूर्तिजापूर), गावंडगाव (ता. पातूर), इसापूर (ता. तेल्हारा) या गावांच्या सरपंच व सचिवांना प्रदान करण्यात आला.

कारागृह सेवेतील उत्कृष्ट कामाबद्दल शिपाई गिरीश अंधारे, किशोर गावंडे, धीरजसिंह ठाकूर यांना गौरविण्यात आले. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या उत्कृष्ट कामाबद्दल जिल्हा महिला रूग्णालय व संत तुकाराम रूग्णालयाला गौरविण्यात आले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ