नियोजनभवनात गुरूवारी ‘एक्स्पोर्ट आऊटरिच’ कार्यक्रम

 

नियोजनभवनात गुरूवारी ‘एक्स्पोर्ट आऊटरिच’ कार्यक्रम

अकोला, दि. 1 : जिल्ह्यातील निर्यातीस वाव व प्रोत्साहन मिळण्याच्या उद्देशाने जिल्हा उद्योग केंद्रातर्फे ‘एक्स्पोर्ट आऊटरिच’ कार्यक्रम नियोजनभवनात गुरूवारी (3 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता होईल. या कार्यशाळेत नागपूर येथील निर्यात तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

 आत्मनिर्भर भारत संकल्पनेनुसार ‘मेक इन इंडिया’साठी प्रत्येक जिल्हा निर्यात केंद्र करण्याचा उद्देश आहे. निर्यात वाढल्यास जिल्ह्यात उत्पादन व रोजगारनिर्मितीत वाढ होईल. त्यानुसार विदेश व्यापार महासंचालनालयाच्या नागपूर विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. व्ही. रमण यांच्या मार्गदर्शन व सहकार्यानुसार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी अजित कुंभार कार्यक्रमाला उपस्थित असतील.

आयईसी कस्टम प्रक्रिया, एमएसएमई योजना, निर्यात कशी करावी, बायर-सेलर मीट, इपीसीची भूमिका, वित्तीय साह्य मिळविण्याचे पर्याय ई-कॉमर्स आदींबाबत विदेश व्यापार महासंचालनालयाच्या तज्ज्ञांची टीम मार्गदर्शन करणार आहे. निर्यातीबाबत अडीअडचणी, योजना आदींबाबत प्रश्नोत्तरांचा कार्यक्रमही यावेळी होईल.

जिल्ह्यातील सर्व उद्योजक, संघटना, एफपीओ, उद्यमशील युवक-युवती, सध्या कार्यरत निर्यातदार आदींनी या कार्यक्रमात सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नीलेश निकम यांनी केले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ