जिल्ह्यात ठिकठिकाणी युरिया खत उपलब्ध

 

जिल्ह्यात ठिकठिकाणी युरिया खत उपलब्ध

अकोला, दि. 21 : जिल्ह्यात युरिया खताच्या सर्वत्र उपलब्धतेसाठी संरक्षित साठ्यातून  प्रत्येक तालुक्यातील विक्रेत्यांकडे खत उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, यापुढेही जिल्ह्यात आवश्यक पुरवठ्यासाठी या आठवड्यात युरिया उपलब्ध होणार आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी दिली.

संरक्षित साठ्यातून एकूण 312.138 मे. टन युरिया प्रत्येक तालुक्यातील विक्रेत्यांकडे उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार दि. 21 ऑगस्ट रोजी विक्रेत्यांकडे उपलब्ध युरिया खत साठा पुढीलप्रमाणे (परिमाण मे. टन) : अकोला तालुक्यात महाराष्ट्र ट्रेडर्स, कुरणखेड (17.55), पाटणी ट्रेडर्स, अकोला (25.335), संदेश कृषी सेवा केंद्र, मजलापूर (11.7), सुजय कृ. से. कें., दहीहंडा (11.7), अकोट तालुक्यात अकोट तालुका सेवा सह. संस्था कृ. से. केंद्र (10.125), नीलेश ॲग्रो, सावरा (12.15), श्री स्वामी समर्थ केंद्र, मुंडगाव, (12.15), वृषाली ॲग्रो सेंटर, अकोट (13.923), बाळापूर तालुक्यात गणपती ॲग्रो, निंबा फाटा (25.2), ठाकरे कृ. से. कें., हातरूण (9.675), शिवकृपा कृ. से. कें., निमकर्दा (10.575) खत उपलब्ध आहे.

त्याचप्रमाणे, बार्शिटाकळी तालुक्यात आनंद ट्रेडर्स (14.04), माऊली कृ. से. कें., बार्शीटाकळी (5.49), लोककल्याण शेतकरी से. कें., पिंजर (12.15), गोकुळ कृ. से. कें., महान (7.65), मूर्तिजापूर तालुक्यात महालक्ष्मी ॲग्रो एजन्सी (25.65), मूर्तिजापूर तालुका सह. संस्था कृ. से. कें.(10.125), तेल्हारा तालुक्यात दधिमती कृ. से. कें. (18.675), जय गजानन कृ. से. कें., माडेगाव बाजार (5.175), पातूर तालुक्यात दीपा कृ. से. कें., पातूर (11.025), हनुमान कृ. से. कें. आशोला (11.7), सियाराम कृ. से. कें. अंबाशी (11.7), गायत्री कृ. से. कें., सस्ती (10.125). दत्त कृ. से. कें., पातूर (8.55) इतका साठा उपलब्ध आहे.

जिल्ह्यात खतांची कमतरता भासू नये यासाठी प्रशासन दक्षता घेत असून, लवकरच जिल्ह्यात आणखी साठा उपलब्ध होणार आहे, असे श्री. किरवे यांनी सांगितले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ