पातूर तालुक्यातील अंगणवाड्यांतील पदांसाठी 279 अर्ज प्राप्त

 पातूर तालुक्यातील अंगणवाड्यांतील पदांसाठी 279 अर्ज प्राप्त

अकोला, दि. 2 : एकात्मिक बालविकास सेवा योजनेत पातुर तालुक्यातील विविध गावांतील अंगणवाड्यांतील मदतनीस पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी 279 अर्ज प्राप्त आहेत.

प्राप्त अर्जांची समितीमार्फत पडताळणी होऊन शैक्षणिक गुणवत्तेनुसार निवड होईल. ही प्रक्रि

या पारदर्शीपणे राबविण्यात येत असून कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिका-यांनी केले आहे.

बोडखा, सावरखेड, खानापूर, माळराजुरा, तांदळी खु., विवरा, देऊळगाव, तांदळी बु., आलेगाव, चरणगाव, शेकापूर, पाचरण, सोनुना, तुलंगा, शिरपूर, पिंपळखुटा, दिग्रस, चान्नी, मळसूर, राहेर, गावंडगाव, झरंडी, सावरगाव, पाडसिंगी आदी गावांमधील अंगणवाड्यांसाठी मदतनीसांची पदे भरली जाणार आहेत.  

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ