‘एफडीए’तर्फे ‘इट राईट मिलेट’ मेळावा

 अकोला, दि. 14 : आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त अन्न व औषध प्रशासनामार्फत ‘इट राईट मिलेट’ मेळावा उद्या, दि. 15 ऑगस्ट रोजी जुन्या आरटीओ रस्त्यावरील महेशभवनात दु. 3 ते रात्री 8 या वेळेत होईल.  

भरडधान्याचे विविध पदार्थ यावेळी अकोलेकरांना चाखायला मिळतील. मेळाव्यात शेफ अंजुल गुप्ता पाककृतींबाबत सादरीकरण करणार आहेत. बालकांसाठी मनोरंजक खेळ, आरोग्य शिबीरही आयोजिण्यात आले आहे. भरड धान्याचे पौष्टिक गुणधर्म व जंक फूडचे दुष्परिणाम याबाबत या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नागरिकांनी मेळाव्यात सहभाग घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त सागर तेरकर यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा