कोतवाल पदाची परीक्षा 20 ऑगस्टला होणार

 कोतवाल पदाची परीक्षा 20 ऑगस्टला होणार

       अकोला, दि. 15 :  अकोला जिल्ह्यात सातही तालुक्यातील कोतवालाची रिक्त पदे भरण्यात येत असून, त्याची भरती परीक्षा एकूण 12 केंद्रांवर  रविवार दि. 20 ऑगस्ट रोजी होणार आहे. परीक्षेसाठी दि. 11 ऑगस्टपासून सर्व तहसील कार्यालय स्तरावर प्रवेशपत्र वितरणाची कार्यवाही सुरू आहे.

ही परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी काटेकोर कार्यवाही होत आहे. परीक्षा देणा-या उमेदवारांनी त्रयस्थ व्यक्तींशी संपर्क साधून कोणत्याही प्रलोभनाला,अमिषाला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले.

 निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील हे परीक्षा नियंत्रक असून, सहा. नियंत्रण अधिकारी अधिक्षक अविनाश शिंगटे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कोतवाल परीक्षेसाठी संबंधित उमेदवारांना काही अडचण असल्यास त्यांनी संबंधित तहसिल कार्यालय अथवा जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ