तालुका लोकशाहीदिन महिन्यातील तिस-या सोमवारी

 

तालुका लोकशाहीदिन महिन्यातील तिस-या सोमवारी

अकोला, दि. 23 : तालुका लोकशाहीदिन प्रत्येक महिन्यातील तिस-या सोमवारी घेण्यात येत असून, नागरिकांनी आपली निवेदने, मागण्या तालुका स्तरावरील लोकशाहीदिन कार्यक्रमात सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी न्याय व तत्परतेने सोडविण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त व मंत्रालय स्तरावर वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. त्याच अनुषंगाने तालुका स्तरावरील लोकशाहीदिन प्रत्येक महिन्याच्या तिस-या सोमवारी सकाळी 10 वा. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली आयोजिण्यात येतो. त्यामुळे संबंधित तालुक्यातील नागरिकांनी तालुका स्तर उपक्रमात आपल्या मागण्या, निवेदने सादर कराव्यात. निराकरणाबाबत काही अडचण आल्यास तालुका लोकशाही दिन उपक्रमानंतर एका महिन्याने जिल्हा लोकशाही दिनात अर्ज करता येईल, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ