दिव्यांगाना सर्व योजनेचा लाभ देवून त्यांना रोजगार व उद्योगक्षम बनवा - पालकमंत्री ना. बच्चू कडू
अकोला,दि.4(जिमाका)- राज्यशासन व
केन्द्रशासनाच्या दिव्यांगासाठी असलेल्या विविध योजनेचा एकत्रीकरण करुन त्यांची
सागळ घालून दिव्यांगाना रोजगार व उद्योगक्षम बनवा असे प्रतिपादन राज्याचे
जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व
बालविकास इतर
मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त
जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार
राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू
कडू यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात दिव्यांगासाठी असलेल्या पाच टक्के
निधीचा आढावा पालकमंत्री ना. कडू यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज
कल्याण अधिकारी आर.एस. वसतकर, वैद्यकीय साजाजिक कार्यकर्ता डि.एम.पुंड आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा