299 अहवाल प्राप्त; 97 पॉझिटीव्ह, 40 डिस्चार्ज, एक मयत

 


अकोला,दि.20(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे  299 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 202 अहवाल निगेटीव्ह तर 97 अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज एक मयत झाले.  

त्याच प्रमाणे काल (दि. 19) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 14 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 6532 (5347+1030+155) झाली आहे. आज दिवसभरात 40 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 35465 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे  34554, फेरतपासणीचे 197 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 714 नमुने होते. आजपर्यंत एकूण 34931 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 29584 तर पॉझिटीव्ह अहवाल  6532 (5347+1030+155) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 97 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरा 97 जणांचे अहवा  पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 58 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 22 महिला व 36 पुरुषांचा समावेश आहे. त्यात मुर्तिजापूर येथील 21 जण, वाडेकर लेआऊट येथील सहा  जण, जीएमसी व जुने शहर येथील प्रत्येकी चार जण, मोठी उमरी व चांन्नी ता. पातुर येथील प्रत्येकी तीन जण,पातुर  येथील दोन जण, तर उर्वरित सुधीर कॉलनी, आनंद नगर,शास्त्री नगर, अकोट, गीता नगर, हिवरखेड, खदान, अकोला शहर, जठारपेठ, जामठी, सिरसो, बालाजी नगर, घुसर, सुयोग कॉलनी व तापडीया नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी 39 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 15 महिला व 24 पुरुषांचा समावेशआहे.  त्यातील जीएमसी येथील सात जण, अकोट येथील पाच जण, बालाजी नगर,अकोट फैल व सिव्हील लाईन येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित कृषी नगर, चांदूर, डाबकी रोड, मुर्तिजापूर, रणपिसे नगर,  गंगा नगर, जीएमसी हॉस्टेल, पिंजर, बाळापूर, खडकी, चांदणी, रामनगर, कौलखेड, पातूर, चोहट्टा बाजार, दहिहांडा, हरिहरपेठ, भांबेरी ता.तेल्हारा, सार्थी,  मोठी उमरी व सिरसोली ता. तेल्हारा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.  तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये 14  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कृपया नोंद घ्यावी.

एक मयत

  दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. त्यात कुरुम, मुर्तिजापूर येथील 53 वर्षीय महिला असून ती दि. 17 सप्टेंबर  रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला.

 

40 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतरशासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 40 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

 

1591 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 6532 (5347+1030+155) आहे. त्यातील 209 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  4732 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 1591 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ