कोविड-19 साठी खासगी डॉक्टरांनी पुढे यावे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन


अकोला,दि. 22 (जिमाका)- जिल्ह्यात दिवसेंदिवस कोवि-19 चा प्रादुर्भाव वाढत असून शहरी व ग्रामीण भागात रुग्णांच्या संख्येत सतत भर पडत आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय यंत्रणेवर ताण वाढत चालला आहे. तसेच वारंवार जाहिरात देऊन सुद्धा वैद्यकीय अधिकारी कोविड-19 उपचारासाठी उपलब्ध होत नाही. तरी खाजगी डॉक्टरांनी पुढे येवून शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

            राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कोविड-19 च्या  साथरोगांच्या अंमलबजावणीसाठी तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर दर सोमवारी थेट मुलाखतीद्वारे पदे भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली आहे. परंतु या जाहिरातीला योग्य प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे कोविड-19 च्या कामासाठी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नाहीत. जिल्ह्यात  48 एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. यापैकी 24 अधिकारी वैद्यकीय महाविद्यालयात व 24 अधिकारी सर्वोपचार रुग्णालय येथे  कार्यरत राहतील. परंतु वारंवार जाहिरात देऊन सुद्धा जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नाहीत. काल झालेल्या मुलाखतीमध्ये एक एमबीबीएस, एक बीएएमएस चार बीडीएस डॉक्टरची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाच्या जाहिरातीला अल्प प्रतिसाद आहे, कोविड मध्ये काम करण्यास तयार होत नाहीत .

            नव्याने 300 बेड्सचे कोविड हेल्थ सेंटर तयार करण्यासाठी अडचणी येत आहे.  यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे. ती आवश्यकता लक्षात घेवून दर सोमवारी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे, पण एमबीबीएस, बीएएमस, बीडीएससाठी जाहिरात काढून सुद्धा मुलाखतीला सुद्धा येत नाहीत व आले तर आम्हाला नॉन कोविड मध्ये द्या, कोविडसाठी आदेश दिला तर येत नाहीत, त्यामुळे नवीन वाढीव खाटासाठी, मनुष्यबळाची कमतरता भासत आहे, ती कमतरता दूर करण्यासाठी खाजगी डॉक्टरांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.  इच्छुक डॉक्टरांनी जिल्हा प्रशासन किंवा आरोग्य प्रशासनाशी संपर्क साधावा.            

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ