406 अहवाल प्राप्त; 75 पॉझिटीव्ह, 132 डिस्चार्ज, एक मयत

 


अकोला,दि.10(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 406 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 331  अहवाल निगेटीव्ह तर 75 अहवाल पॉझिटीव्ह आले.

त्याच प्रमाणे काल (दि. 9) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 81  तर खाजगी लॅब मध्ये आज कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 5120 (4057+916+147)  झाली आहे. आज दिवसभरात 132 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 31877 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 31039, फेरतपासणीचे 189 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 649 नमुने होते. आजपर्यंत एकूण 31506 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 27449  तर पॉझिटीव्ह अहवाल  5120 (4057+916+147) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 75 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरा 75 जणांचे अहवा  पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी 53 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 16 महिला व  37 पुरुषांचा समावेश आहे.  त्यातील कान्हेरी ता. बाळापूर येथील सात जण, अकोट येथील सहा जण, बार्शीटाकळी व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी पाच जण, डाबकी रोड  येथील तीन जण, शास्त्री नगर, जठारपेठ, अंबुजा फॅक्टरी ता. बाळापूर, ‍चिखलगाव येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित पाटी, नकाशी ता. बाळापूर, रामदासपेठ, देशमुख फैल, मोठी उमरी, कौलखेड, मोर्णा कॉलनी, हरिहरपेठ, तेल्हारा, सुधिर कॉलनी, दोनद खु. ता. बार्शिटाकळी, रजपूतपुरा, पारस, मुर्तिजापूर, रतनलाल प्लॉट, जूने शहर, राजेश्वर कॉलनी, रामनगर, खामखेड प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी 22 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 10 महिला व 12 पुरुषांचा समावेश आहे.  त्यातील गिता नगर, गौरक्षण रोड व वाशिम बायपास येथील प्रत्येकी तीन जण,  दामाणी हॉस्पीटल मागे व दुबे वाडी येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित उमरी, गायत्री नगर, जीएमसी, निंबा, सिंधी कॅम्प, डाबकी रोड, देशमुख फैल, विठ्ठलवाडी व हरिहर पेठ येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये 81 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तसेच ध्रुव पॅथॉलॉजी लॅब, नागपूर या खाजगी प्रयोगशाळेतून आज कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, कृपया नोंद घ्यावी.

एक मयत

दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण जठारपेठ, अकोला येथील 71 वर्षीय पुरुष असून तो दि. 22 ऑगस्ट  रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला.

132 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 44 जण, कोविड केअर सेंटर, अकोला येथून 57 जण, आयकॉन हॉस्पिटल येथील तीन जण, हॉटेल रिजेन्सी येथील तीन जण, तर कोविड केअर सेंटर, हेंडज मुर्तिजापूर येथून 25 जणांना असे एकूण 132 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

1089 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 5120 (4057+916+147) आहे. त्यातील 173 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  3858 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 1089 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ