रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 210 चाचण्या, आठ पॉझिटिव्ह


अकोला,दि. 22 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 210 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

            आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-  अकोला ग्रामिण, बाळापूर व मुर्तिजापूर  येथे चाचण्या झाल्या नाही. तर अकोट येथे 13 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, बार्शीटाकळी येथे चार चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला. पातुर येथे 109 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचा  अहवाल पॉझिटिव्ह आला. तेल्हारा येथे आठ चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. तसेच अकोला मनपा अकोला आयएमए येथे चाचण्या झाल्या नाही, 72 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात त्यापैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून चार चाचण्या झाल्या त्यापैकी  एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आले, असे दिवसभरात  210 चाचण्यांमध्ये  आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 16174 चाचण्या झाल्या त्यात 1092 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ