‘नो मास्क, नो एंट्री’ मोहिम मोठया प्रमाणात राबवा; जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

 



अकोला,दि. 25 (जिमाका)-  कोविड-19 चा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत असून शहरी व ग्रामीण भागात रुग्णाच्या संख्येत सतत भर पडत आहे. कोविड-19 चे संक्रमण कमी करण्यासाठी मास्क वापर करणे अनिवार्य आहे. तसेच सामाजिक अंतर ठेवून व वेळोवेळी साबनाने हात स्वच्छ करणे तसेच सॅनिटायझरचा वापर करुण या रोगाचे संक्रमण कमी करता येते. यासाठी  नो मास्क, नो एंन्ट्रीमोहिम मोठ्या प्रमाणावर राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांनी  दिलेत.

जिल्हाधिकारी परिसरात येणारे नागरीक बिना मास्क निष्काळजीपणे फिरत असताना दिसून येतात. याला आळा घालण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला अधिकारी व कर्मचारी यांचे पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात 10 नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही करुन दोन हजार चारशे रुपयांचे दंड वसूल केला. या पथकात अधिक्षक मीरा पागोरे, नगर प्रशासन अधिकारी सुप्रीया टवलारे, वर्षा कुजाडे, स्नेहा गिरी गोसावी, थिटे सहभागी झाले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ