रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 334 चाचण्या, 81 पॉझिटिव्ह
अकोला,दि. 9 (जिमाका)- कोरोना
संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत हे. यात आज
दिवसभरात झालेल्या 334 चाचण्या झाल्या त्यात 81 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी
उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण येथे 133 चाचण्या झाल्या त्यात 29 जणांचा अहवाल
पॉझिटिव्ह आला, अकोट येथे 30 चाचण्या झाल्या त्यात नऊ जणांचा अहवाल
पॉझिटिव्ह आला, बाळापूर
येथे पाच चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, बार्शीटाकळी येथे चार चाचण्या झाल्या
त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, पातूर
व तेल्हारा येथे चाचण्या झाले नाही. मुर्तिजापूर
येथे 98 चाचण्या झाल्या त्यात 39 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच अकोला मनपा
येथे चाचण्या झाल्या नाही, अकोला आयएमए येथे 12
चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय येथे चाचण्या झाल्या नाही, 52 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात एकाचा
अहवाल पॉझिटीव्ह आला, असे दिवसभरात 334 चाचण्यांमध्ये 81 जणांचे
अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 14406 चाचण्या झाल्या त्यात 924 जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा