एमएचटी-सिईटी सामाईक परिक्षा केन्द्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

 


अकोला,दि. 30 (जिमाका)- परिक्षा केन्द्रावर आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशपरिक्षा एमएचटि-सिईटी सामाईक परिक्षा-2020 चे 1 ऑक्टोंबर ते 20 ऑक्टोंबर 2020 या कालावधीत सकाळी 7.30 ते सायं. 6 वा. 54 मिनीट या वेळेत अकोला जिल्ह्यातील एकूण तीन उपकेन्द्रावर आयोजन केलेले आहे. त्या अनुषंगाने संबंधित परिक्षा केन्द्रावर गैरप्रकार होवू नये. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये व कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीस किवा वाहनांस प्रवेशबंदी घालणे आवश्यक आहे. यासाठी फौजदारी प्रक्रिया 1973 चे कलम 144 अतंर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहे.  हा आदेश प्रिमियर इन्फोटेक गौरक्षण रोड मलकापूर, उतीर्ण एक्झामिनेशन युनिट ठाकूरदास हाईट्स, एमएससीबी ऑफीस समोर, दुर्गा चौक व कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग अँन्ड टेक्नॉलॉजी, बाबुळगाव या तीन उपकेन्द्रावर 1 ऑक्टोंबर ते 20 ऑक्टोंबर रोजी सकाळी 6 ते संध्या 8 वाजेपर्यंत परीक्षा केन्द्राच्या आतील संपुर्ण परिसरात व केन्द्राच्या आतील संपूर्ण परिसरात व केन्द्राच्या बाहेरिल लागू असलेल्या 100 मीटर परिसरात लागू राहतील.

परिक्षा केंद्राचे परिसरात प्रवेश करतेवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित‍रीत्या प्रवेश करणार नाहीत. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाहीत, परिक्षा केंद्रावर प्रवेश करणाऱ्या सर्व परिक्षार्थी, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे थर्मल, इफ्रारेड थर्मामिटरव्दारे तापमान तपासण्यात यावे, हवा खेळती राहण्याचे दृष्टीने परिक्षा केंद्रावरील सर्व खिडक्या तसेच दरवाजे उघडया ठेवण्यात याव्यात, सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच परीक्षार्थी यांना मास्कचा वापर करणे बंधनकारक राहिल. मास्क लावल्याशिवाय देण्यात येवू नये, प्रत्येक परिक्षार्थी मध्ये किमान तीन फुटाचे अंतर राहील अशी बैठक व्यवस्था करण्यात यावी, परिक्षा केंद्राचे प्रवेशव्दारासमोर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात यावी, परिक्षा केंद्राच्या परिसराची स्वच्छता हायपोक्लोराईटच्या साह्याने निर्जंतुकीकरण करण्यात यावे.

कोणत्याही परिक्षार्थी, अधिकारी, कर्मचारी यांना कोविड-19 ची लक्षणे दिसून आल्यास तात्काळ नजीकच्या रुग्णालयात भरती करावे, परिक्षा केंद्राच्या परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करण्यात येणार नाहीत, परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर, फॅक्स मशीन, पानपट्टी, लॅपटॉप, टायपिंग सेंटर एसटीडी बुथ, ध्वनीक्षेपक इत्यादी माध्यम परीक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्यात येतील, परीक्षा केंद्राचे परिसरात इंटरनेट, मोबाईल फोन, सेल्युलर फोन, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई राहील, परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्ती व वाहनास प्रवेशास मनाई राहील, वरील आदेश परीक्षा केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचारी, परिक्षार्थी तसेच परीक्षा केंद्रावर देखरेख करणारे अधिकृत अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी यांचेबाबत परीक्षा संबंधित कर्तव्य पार पाडण्याचे दृष्टीने लागू राहणार नाहीत, असे आदेशाव्दारे कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ