अण्‍णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून टॅक्‍टरच्‍या लाभार्थांला जिल्‍हाधिकारी यांच्या हस्ते चावीचे वितरण


 

                        अकोला,दि. 24 (जिमाका)-  स्‍व.कै.आ.मा.अण्‍णासाहेब पाटील यांचे 87 व्‍या जयंतीचे औचित्‍य साधून अण्‍णासाहेब पाटील आर्थिक मागास  विकास महामंडळाकडून जिल्‍हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्‍ते अण्‍णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्‍या वैयक्‍तीक कर्ज व्‍याज परतावा या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांला टॅक्टर चाबीचे वितरण करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्‍हाधिकारी संजय खडसे, किमान कौशल्‍य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी दत्‍तात्रय एकनाथ वावगे, अण्‍णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्‍हा समन्‍वयक रो‍हीत बारस्‍कर, तसेच फार्मट्रॅक कंपनीचे विक्री प्रतिनिधी गणेश श्रीराम खेते व गोपाल खापरकर यांची उपस्थिती होती.

            अण्‍णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्‍या वैयक्‍तीक कर्ज व्‍याज परतावा या योजनेअंतर्गत कोटक महेंद्र बॅक कडून 5 लक्ष 75 हजार रुपये किंमतीच्या टॅक्टरची चाबी बाळापूर तालुक्यातील निंबा येथील शेतकरी गणेश नारायणराव देशमुख यांना देण्यात आली. कर्जावरील योजने अंतर्गत लार्भाथ्‍याला 12 टक्केपर्यत व्‍याजाचा परतावा महामंडळाकडून करण्‍यांत येतो. सदर योजने अंतर्गत 110 लाभार्थांनी 5 कोटी 49 लाख 22 हजार 225 एवढे अर्थसहाय्य विविध बॅकांकडून मंजूर करण्यात आले असून त्‍यावरील व्‍याजाचा परतावा महामंडळा कडून 32 लाख 38 हजार 156  एवढा लाभार्थाच्‍या खात्‍यात जमा करण्‍यांत आला. सदर योजना मराठा प्रवर्गाकरीता शासना कडून राबविण्‍यात येत असून या योजनेचा  जास्‍तीतजास्‍त लाभ स्‍वयंरोजगार सुरु करण्‍यास इच्‍छूक उमेदवारांनी घ्‍यावा असे आवाहन जिल्‍हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ